Posts

Showing posts with the label Dr. Prakash Amate

Book Review - प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे

Image
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण स्वतंत्र बनवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगायची संधी मिळवून देण्यासाठी डॉ. प्रकाश आमटेंनी त्यांच्या साथीदारांसोबत केलेल्या प्रयत्नांचं एक प्रवासवर्णनच या पुस्तकातून लिहिलं आहे, असं मी म्हणेल. या पुस्तकामुळे   मला अजून एक प्रेरणादायी जीवनप्रवास वाचायला मिळाला. माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसे, कपडे घालायची सवय नसे, दुसरी भाषा येत नसे. पण एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित न्हवत तर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं कमालीचं अज्ञान आणि अफाट दारिद्र्य होतं. गरिबीमुळे दोन वेळच्या खाण्याची मारामार त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवायच्या तजविजीत असतं. आणि खाणं काय, तर कंदमुळ, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीसुद्धा. कारण यापलीकडे दुसरे काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती....