Posts

Showing posts with the label Book Review

मुकद्दर

Image
चित्रपट, मालिका, कादंबऱ्या, कथा यांमधून दाखवलेला म्हातारा, धर्मवेडा, कोणाशीही सहज न बोलणारा औरंगजेब आणि त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व ह्यात खूप फरक आहे. औरंगजेब केवळ आपल्याला प्रादेशिक पातळीवर चित्रपट आणि मालिकांच्या बजेटएवढाच किरकोळ दाखवला जातो. आपल्याला ठाऊक असलेला औरंगजेब फार मर्यादित आहे. आपल्याला माहीत आहे, आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तख्त-ए-ताऊसवर बसलेला औरंगजेब ज्याने 'न भूतो न भविष्यति' असा आपला झालेला अपमान पचवला. संभाजी महाराजांचा क्रूर छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला तो औरंगजेब माहीत नाही, जो वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बुऱ्हाणपुरात आपल्या मावशीकडे गेलेला असताना एका बाईच्या प्रेमात पडला होता. तिच्या इष्कात तो इतका बेभान झाला होता की, तिच्याखातर इस्लामच्या विरोधात जाऊन तो दारूही प्यायला सुद्धा तयार झाला होता. आपल्याला औरंगजेब ठाऊकच नाही, ज्याने तख्त मिळवण्यासाठी आपल्या सख्ख्या भावाना मारून टाकलं. तो औरंगजेब माहीत नाही ज्याने फितुरी करून आपल्या भावाला युद्धात मदत केली म्हणून सख्ख्या मुलाला आजन्म कारावासात ठेवलं. आपल्या सख्

हिंदूत्व

Image
रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितले म्हणजे देशातील त्यावेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता राहत नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नावाने इंग्रजीत लिहिला व त्याचे मराठी भाषांतर नंतर झाले. सावरकरांनी "हिंदूपण" किंवा "हिंदू असणे" याचे वर्णन करण्यासाठी "हिंदुत्व" हा शब्द वापरला. ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला. याचे कारण, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, तसा तो अजूनही जोडला जातोच, पण सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसे ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे तसे त्यांना अभिप्रेत होते ते ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदूपण’. सावरकरांनी हिंदुत्वाला वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख मानली. सावरकारांची हिंदुत्वाची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाही. याउलट ती भाषा, जाती, ‘मतें’ (

Book Review - प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे

Image
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण स्वतंत्र बनवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगायची संधी मिळवून देण्यासाठी डॉ. प्रकाश आमटेंनी त्यांच्या साथीदारांसोबत केलेल्या प्रयत्नांचं एक प्रवासवर्णनच या पुस्तकातून लिहिलं आहे, असं मी म्हणेल. या पुस्तकामुळे   मला अजून एक प्रेरणादायी जीवनप्रवास वाचायला मिळाला. माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसे, कपडे घालायची सवय नसे, दुसरी भाषा येत नसे. पण एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित न्हवत तर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं कमालीचं अज्ञान आणि अफाट दारिद्र्य होतं. गरिबीमुळे दोन वेळच्या खाण्याची मारामार त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवायच्या तजविजीत असतं. आणि खाणं काय, तर कंदमुळ, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीसुद्धा. कारण यापलीकडे दुसरे काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती. त्य

Book Review - नारायण मूर्ती जीवन चरित्र

Image
नारायण मूर्तीचं जीवनचरित्र असलेलं हे पुस्तक फक्त त्यांचं जीवनचरित्रच समोर ठेवत नाही तर इन्फोसिस कंपनीचा वर्तमानापर्यंतचा प्रवाससुद्धा वाचकासमोर ठेवतं. आलेल्या संधीचा घेतलेला योग्य फायदा जसं की उदारीकरणामुळे खुली झालेली बाजारपेठ, ग्राहकांची जपणूक, कर्मचाऱ्यांची काळजी, जागतिक दर्जाची कार्यप्रणाली या आणि अश्या बऱ्याचश्या मुद्द्यांमुळे इन्फोसिस आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचू शकली. मूर्तींच्या आणि इन्फोसिसच्या या जीवनप्रवासात सुधा मूर्तींचीही वेळोवेळी साथ मिळाली.⠀ ⠀ तरुणवयात मूर्ती समाजवादी विचाराचे होते. पण १९७४च्या बल्गेरियामधील एका प्रसंगाने त्यांना त्यांच्या साम्यवादाबद्दलच्या धाराणांवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले, त्यांचे डाव्या विचारसरणीचे आकर्षण पूर्णपणे पुसून टाकले. त्यामुळे त्यांचे एका गोंधळलेल्या डाव्या मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यातून एका कनवाळू पण निश्चयी भांडवलदारामध्ये रुपांतर केले. पण असे असले तरी या पुस्तकात दिलेल्या कंपनीच्या धोरणांत आणि मूल्यांमध्ये मला समाजवादी विचार ठळकपणे दिसून येतात.⠀ ⠀ पुस्तकातील व्यवसायाचं धोरण, इन्फोसिसमधील कॉर्पोरेट संस्कृती या प्रकरणांतून इन्फोस