Book Review - नारायण मूर्ती जीवन चरित्र




नारायण मूर्तीचं जीवनचरित्र असलेलं हे पुस्तक फक्त त्यांचं जीवनचरित्रच समोर ठेवत नाही तर इन्फोसिस कंपनीचा वर्तमानापर्यंतचा प्रवाससुद्धा वाचकासमोर ठेवतं.

आलेल्या संधीचा घेतलेला योग्य फायदा जसं की उदारीकरणामुळे खुली झालेली बाजारपेठ, ग्राहकांची जपणूक, कर्मचाऱ्यांची काळजी, जागतिक दर्जाची कार्यप्रणाली या आणि अश्या बऱ्याचश्या मुद्द्यांमुळे इन्फोसिस आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचू शकली. मूर्तींच्या आणि इन्फोसिसच्या या जीवनप्रवासात सुधा मूर्तींचीही वेळोवेळी साथ मिळाली.⠀

तरुणवयात मूर्ती समाजवादी विचाराचे होते. पण १९७४च्या बल्गेरियामधील एका प्रसंगाने त्यांना त्यांच्या साम्यवादाबद्दलच्या धाराणांवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले, त्यांचे डाव्या विचारसरणीचे आकर्षण पूर्णपणे पुसून टाकले. त्यामुळे त्यांचे एका गोंधळलेल्या डाव्या मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यातून एका कनवाळू पण निश्चयी भांडवलदारामध्ये रुपांतर केले. पण असे असले तरी या पुस्तकात दिलेल्या कंपनीच्या धोरणांत आणि मूल्यांमध्ये मला समाजवादी विचार ठळकपणे दिसून येतात.⠀

पुस्तकातील व्यवसायाचं धोरण, इन्फोसिसमधील कॉर्पोरेट संस्कृती या प्रकरणांतून इन्फोसिस च्या यशाचं गमक कळते. सोबतच इन्फोसिस फाऊंडेशनच्या माधमातून मूर्तींनी केलेल्या सामाजिक कार्याचीही माहिती मिळते. एक प्रेरणादायी जीवनप्रवास नक्की वाचायला मिळाला.⠀

हे पुस्तक छोटेखानी आहे परंतु व्यवसाय करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचं जीवनचरित्र मांडणारं पुस्तक आहे. नक्की वाचा.

Comments

Popular posts from this blog

लोकसभा निवडणूक २०१९ निकालाचं विश्लेषण

"पंच्याहत्तरीतला भारत..."

Happy Birth Day To You….!!!

Book Review - प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे