लोकसभा निवडणूक २०१९ निकालाचं विश्लेषण



काही विश्लेषकांकडून आणि Exit Polls मधून BJPला २२०-२५० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. त्यांच्यासाठी आणि विरोधकांसाठी हा निकाल नक्कीच धक्कादायक असेल. माझादेखील अंदाज तोच होता. लोकसभा निवडणुकांसोबत ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होत्या. तिथेही BJPने २-३ राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्याआहेत.

निवडणुकीच्या आधी ज्या काही घटना घडत होत्या आणि विरोधक ज्या तीव्रतेने मुद्दे उचलून धरत होते त्यानुसार आणि निवडणुकीदरम्यानची काही मुद्दे BJPच्या काही उमेदवारांनी केलेली काही वादग्रस्त विधाने त्यामुळे माझा असा अंदाज होता. गेल्या २-३ वर्षात BJPची काही राज्यांतील घसरण आणि तेथील सरकार गमावणे याची background त्याला होती. पण निकालांवरून असंच दिसतंय की मतदार मत देताना नक्कीच मत कोणत्या निवडणुकीसाठी देताय याचा विचार करून देतात. त्यांनी विधानसभेमध्ये कॉंग्रेसला दिलं म्हणून लोकसभेमध्येसुद्धा कॉंग्रेसला देतील हे चुकीच आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधील सरकारे गमावली असतानादेखील अगदी काहीशा फरकाणे का होईना BJPने तेथील लोकसभेच्या जागा राखल्या. कर्नाटकमध्ये जागा वाढल्या आणि दिल्लीतील सगळ्या जागा BJPने जिंकल्या.

पश्चिम बंगालमध्ये मला विश्वास होताच की यावेळी BJPच्या जागा नक्की वाढतील. कारणही तसचं होतं. ममता दीदींनी ज्याप्रकारे गेल्या काही काळापासून तिथे एकाधिकारशाही चालू ठेवली, BJP मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उतरायला परवानगी न देणे, नवरात्र विसर्जनात विसर्जन मिरवणुकीला अडवणूक करणे, प्रचारामध्ये देखील TMC कार्यकर्त्यांनी केलेला गोंधळ याचा फायदा BJPला झाला. त्यामुळेच BJP ३ जागांवरून १८ ला जाऊन पोहोचली. BJPचा बंगाल मधील वाढता प्रभाव दीदींसाठी चिंतेची बाब असेल. अजून २ वर्ष आहेत नाहीतर बंगालच्या येत्या विधानसभा निवडणुकांमध्येदेखील हाच ट्रेंड दिसू शकेल.

कॉग्रेससुद्धा त्यांचे मुद्दे, सरकारची चुकीचे धोरणे, राफेलचा मुद्दा (मलादेखील या खरेदीवर प्रश्न पडलेले आहेत, एखाद्या विमानाची किंमत इतक्या फरकाने कशी काय वाढू शकते आणि ज्या कंपनीला विमाननिर्मिती क्षेत्रातला अनुभवच नाही त्या कंपनीचा विचार तरी कसा होऊ शकतो) मांडता आला नाही, पक्षातील काही जेष्ठ नेत्यांची वादग्रस्त विधाने, NYAY योजनेची Blue Print न्हवती. NYAY योजना सोडून त्यांच्याकडे बाकी काही मोठी आश्वासने न्हवती. राहुल गांधींनीदेखील अमेठीतील कॉंग्रेसची परंपरागत जागा गमावली, मला वाटतं की अमेठीतील जनतेच्या मनाचा बरोबर अंदाज आल्याने त्यांनी वायनाड(केरळ), जीदेखील कॉंग्रेसची परंपरागत जागा आहे, मधून निवडणूक लढवण्याची खेळी केली. प्रियांका गांधीचा देखील दाखवला तसा effect निवडणुकीवर आणि पर्यायाने कॉंग्रेसच्या मताधिक्यावर झाला नाही.

महाराष्ट्रदेखील तिसरी आघाडी म्हणून जी उदयाला आली ती वंचित बहुजन आघाडी हिला देखील त्यांनी केलेल्या प्रचाराप्रमाणे यश भेटलं नाही ते अपेक्षितही होतं. पण त्यांच्याच सहयोगी पक्षाने MIMने महाराष्ट्रामध्ये औरंगाबादची जागा जिंकत खातं खोललं. माझ्यामते MIM साठी अशक्य असलेली हि गोष्टसुद्धा BJP प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांच्या जावयाला केलेल्या मदतीमुळे, असे आरोप त्यांच्यावर होतात, शक्य झाली. कारण तेथून लढणारे शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे ४-५ हजारांच्या मताने हरले, जर स्थानिक BJP कार्यकर्त्यांची मदत त्यांना मिळाली असती तर खैरे निर्विवाद पुन्हा एकदा जिंकून आले असते. गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा MIMने २ जागा जिंकल्या होत्या, एक औरंगाबादमध्ये आणि दुसरी मुंबईत भायखळाची. वंचितने नक्कीच कॉंग्रेसचा जो काही परंपरागत मतदार वर्ग होता तो आपल्याकडे वळवला आणि त्याचा तोटा कॉंग्रेसला झाला आणि काहीसा फायदा BJPला. वंचित आघाडीच्या सभा आणि भाषणांनी त्यांनी ही निवडणूक विधानसभेची तयारी म्हणून केलेली दिसून आलं, डॉ. आंबेडकरांनी प्रसिद्धीमाध्यमांना बऱ्याचदा ते बोलूनही दाखवलेलं आहे. मनसेच्या राज ठाकरेंच्या बेधडक आणि धडाकेबाज सभांचा देखील निकालावर काही फरक पडला नाही पण या सभांमधून त्यांनीही पक्षासाठी विधानसभेची तयारी सुरु केलेली दिसते. मनसे आणि वंचित आघाडी हे दोघेही महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुरस आणतील. म्हणून इतर पक्षांनी निवडणुकीची आखणी करताना मनसे आणि वंचित आघाडीला ग्राह्य धरावा लागेल.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधीपक्ष विकासाच्या योजना declare करायचं सोडून व्यक्ती केंद्रित निवडणूक लढले. विरोधकांनी मतदारांच्या मनात संशयाचं भूत निर्माण करायचा प्रयत्न केला, निवडणूक आयोगाने पारदर्शकता वाढवण्यासाठी VVPAT मशिन्स मतदानात आणली. पण कोणताही पक्ष त्यावर संशय घ्यायच्या तयारीत आत्ता तरी दिसून येत नाही. २०१४ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली होती. तेच विकासाचे मुद्द्यांवर निवडणूक न लढवल्यामुळे UPAची ही हार झाली असं मला वाटतं. त्यामुळे BJP आणि NDAचा विजय हा फक्त त्यांचा विजय नसून हा लोकशाहीचा विजय आहे असं मला वाटतं. २०१४च्या निवडणूक यशात विरोधक मोदी लाटेला मनात न्हवते पण यावेळी BJPने पुन्हा एकदा लोकसभा जिंकून दाखवून दिलंय की २०१४ला तर मोदी लाट होतीच पण यावेळी ती त्सुनामी होऊन विरोधकांना निवडणूकमध्ये हरवत आहे. अजूनही १२ जागांचा निकाल Election Commissionकडून officially declare झालेला नाही पण मतांमधील फरक पहिला तर जागांमध्ये थोड्याफार फरकाने ३५२ जागा मिळवून BJP आणि NDAचं सरकार येईल. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

लोकशाहीचा अजून एक उत्सव अशाप्रकारे संपत आहे.

Comments