लोकसभा निवडणूक २०१९ निकालाचं विश्लेषण
काही विश्लेषकांकडून आणि Exit Polls मधून BJPला २२०-२५० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. त्यांच्यासाठी आणि विरोधकांसाठी हा निकाल नक्कीच धक्कादायक असेल. माझादेखील अंदाज तोच होता. लोकसभा निवडणुकांसोबत ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होत्या. तिथेही BJPने २-३ राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्याआहेत. निवडणुकीच्या आधी ज्या काही घटना घडत होत्या आणि विरोधक ज्या तीव्रतेने मुद्दे उचलून धरत होते त्यानुसार आणि निवडणुकीदरम्यानची काही मुद्दे BJPच्या काही उमेदवारांनी केलेली काही वादग्रस्त विधाने त्यामुळे माझा असा अंदाज होता. गेल्या २-३ वर्षात BJPची काही राज्यांतील घसरण आणि तेथील सरकार गमावणे याची background त्याला होती. पण निकालांवरून असंच दिसतंय की मतदार मत देताना नक्कीच मत कोणत्या निवडणुकीसाठी देताय याचा विचार करून देतात. त्यांनी विधानसभेमध्ये कॉंग्रेसला दिलं म्हणून लोकसभेमध्येसुद्धा कॉंग्रेसला देतील हे चुकीच आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधील सरकारे गमावली असतानादेखील अगदी काहीशा फरकाणे का होईना BJPने तेथील लोकसभेच्या जागा राखल्या. कर्नाटकमध्ये जागा वाढल्या आणि दिल...