महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय

महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय ०२ ऑक्टोबर २०२२ शिक्षणासाठी २०१२मध्ये मी पुण्या त राहण्यास आलो. त्या आधीच्या आयुष्यात, मी पुण्यात मोजून ४-५ वेळाच आलो असेल. पण २०१२पासून जी नाळ पुण्यासोबत जोडली गेली ती कायमचीच. गेल्या ऑगस्ट महिन्यात मला पुण्यात येऊन आता १० वर्षे पूर्ण झाली. या १० वर्षात पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेली बरेचशी बदल, विकासकामं पाहिली. पुणे फिरलो. आजूबाजूचे किल्ले फिरलो, अजूनही बरेचशी बाकी आहेत. मला ऐतिहासिक अश्या वस्तू आणि वास्तू पाहायला, त्यांचा इतिहास जाणून घ्यायला, त्यांच्यामागील ऐतिहासिक गोष्टी ऐकायला खूप आवडतं. तसा नववीपर्यंत इतिहास हा माझा नावडताच विषय होता पण का कोण जाणे दहावीपासून इतिहासात आवड निर्माण झाली ती आज तागायत. त्यामुळे २०१२ला पुण्यात येण्याच्या आधीपासूनच पुणे शहरातल्या बऱ्याचशा जुन्या वास्तू, संग्रहालय, पेशवेकालीन मंदिर पहायची, आसपासची सगळी किल्ले पहायची असं मनाशी ठरवलं होतं. अशांपैकीच महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे जायचं म्हणत होतो पण घराच्...