Posts

Showing posts with the label Trekking

घनगड

Image
घनगड   trek ०५ नोव्हेंबर २०१७ बरेच दिवस झालेले गडवाटा धुंडाळल्या न्हवत्या आणि आठवडाभराच्या कामाच्या व्यापामुळे डोकंदेखील जाम झालेलं. स्वराजचाच मला फोन आला. शनिवारी किंवा रविवारी trek ला जाऊयात पण कुठे तरी नवीन ठिकाणी. मला देखील विचार करून गड ठरवायला सांगितलं. माझ्या डोक्यात सुधागड आला, मी केलेला नसल्यामुळे तिकोणा पण आला. पण तिकोणा त्याने केला असल्यामुळे आणि सुधागडला जायचं तर ताम्हिणी घाट पूर्ण उतरून जावं लागणार म्हणून ते cancle झाले. त्यानेसुद्धा बरीच नावं सांगितली आणि बऱ्याच विचाराअंती घनगडला जायचं ठरलं. मार्ग मुळशीकडूनच होता पण आमच्यासाठी काहीसा नवा होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ७:३०ला निघालो. Trek आधी मिसळ खाण्याची आमची प्रथा तर आहेच पण रविवार म्हटलं कि मिसळ ही पुण्याची सुद्धा एक प्रथा आहे. मग काय, प्रथेप्रमाणे पिरंगुटला श्रीपादची मिसळ खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. ऊन होतं पण सहन होईल एवढं. मुळशी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात शेतकरी रानात त्यांची शेतीची कामे करत होती. काही शेतातली कापणीची काम पूर्ण झालेली तर काही अजून चालू होती. काही १०-१५ माणसं भगवे झेंडे घेऊन रस्त्याने

दुर्गराज दुर्गदुर्गेश रायगड (Raigad Fort)

Image
दुर्गराज रायगड २२ आणि २३ जून २०१९ हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड.... युरोपिअन ह्या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे संबोधतात. कारण जिब्राल्टर जितका अजिंक्य तितकाच रायगडही. दुर्गदुर्गेश्वराला विविध अशा १५ नावांनी संबोधिले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप-वेमुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्या

कोथळीगड(Kothaligad fort) Trek

Image
कोथळीगड trek २३ डिसेंबर २०१८ मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. गडावरील पायऱ्या दगडी पाषाणाच्या असून कोथळ्यासारख्या(पोटातील आतडे) कोरलेल्या आहेत म्हणून कोथळीगड नाव. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. पहाटे ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने मी, स्वराज राजपुत आणि आशिष पाटकर  कर्जत च्या दिशेने निघालो. आशिषचे जवळचे मित्र असलेले अभिनव पानसरे, निखिल म्हस्के, हेमंत शहासने, प्रसाद प्रधान हे सगळे मुंबईच्या दिशेने कर्जत पर्यंत येणार होते. ठरलेल्या वेळी आम्हा सगळ्यांची कर्जतच्या रेल्वे स्टेशन वर भेट झाली. आणि मग एकमेकांची भेट घेऊन ओळख करून देऊन आम्ही सगळे श्रीराम  पुला च्या दिशेने पायी रपेट सुरु केली. कोथळीगडाला कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसनेपण जाता येते. कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवली बस आहे. श्रीराम ब्रिजवरून तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा किंवा जीपापण भेटतात. त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन चौकशी केली.