Posts

Showing posts with the label Ghangad Fort

घनगड

Image
घनगड   trek ०५ नोव्हेंबर २०१७ बरेच दिवस झालेले गडवाटा धुंडाळल्या न्हवत्या आणि आठवडाभराच्या कामाच्या व्यापामुळे डोकंदेखील जाम झालेलं. स्वराजचाच मला फोन आला. शनिवारी किंवा रविवारी trek ला जाऊयात पण कुठे तरी नवीन ठिकाणी. मला देखील विचार करून गड ठरवायला सांगितलं. माझ्या डोक्यात सुधागड आला, मी केलेला नसल्यामुळे तिकोणा पण आला. पण तिकोणा त्याने केला असल्यामुळे आणि सुधागडला जायचं तर ताम्हिणी घाट पूर्ण उतरून जावं लागणार म्हणून ते cancle झाले. त्यानेसुद्धा बरीच नावं सांगितली आणि बऱ्याच विचाराअंती घनगडला जायचं ठरलं. मार्ग मुळशीकडूनच होता पण आमच्यासाठी काहीसा नवा होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ७:३०ला निघालो. Trek आधी मिसळ खाण्याची आमची प्रथा तर आहेच पण रविवार म्हटलं कि मिसळ ही पुण्याची सुद्धा एक प्रथा आहे. मग काय, प्रथेप्रमाणे पिरंगुटला श्रीपादची मिसळ खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. ऊन होतं पण सहन होईल एवढं. मुळशी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात शेतकरी रानात त्यांची शेतीची कामे करत होती. काही शेतातली कापणीची काम पूर्ण झालेली तर काही अजून चालू होती. काही १०-१५ माणसं भगवे झेंडे घेऊन रस्त्य...