Posts

Showing posts with the label Savarkar

हिंदूत्व

Image
रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितले म्हणजे देशातील त्यावेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता राहत नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नावाने इंग्रजीत लिहिला व त्याचे मराठी भाषांतर नंतर झाले. सावरकरांनी "हिंदूपण" किंवा "हिंदू असणे" याचे वर्णन करण्यासाठी "हिंदुत्व" हा शब्द वापरला. ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला. याचे कारण, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, तसा तो अजूनही जोडला जातोच, पण सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसे ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे तसे त्यांना अभिप्रेत होते ते ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदूपण’. सावरकरांनी हिंदुत्वाला वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख मानली. सावरकारांची हिंदुत्वाची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाही. याउलट ती भाषा, जाती, ‘मतें’ (...