Posts

Book Review - प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे

Image
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण स्वतंत्र बनवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगायची संधी मिळवून देण्यासाठी डॉ. प्रकाश आमटेंनी त्यांच्या साथीदारांसोबत केलेल्या प्रयत्नांचं एक प्रवासवर्णनच या पुस्तकातून लिहिलं आहे, असं मी म्हणेल. या पुस्तकामुळे   मला अजून एक प्रेरणादायी जीवनप्रवास वाचायला मिळाला. माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसे, कपडे घालायची सवय नसे, दुसरी भाषा येत नसे. पण एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित न्हवत तर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं कमालीचं अज्ञान आणि अफाट दारिद्र्य होतं. गरिबीमुळे दोन वेळच्या खाण्याची मारामार त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवायच्या तजविजीत असतं. आणि खाणं काय, तर कंदमुळ, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीसुद्धा. कारण यापलीकडे दुसरे काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती. त्य

कोथळीगड(Kothaligad fort) Trek

Image
कोथळीगड trek २३ डिसेंबर २०१८ मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. गडावरील पायऱ्या दगडी पाषाणाच्या असून कोथळ्यासारख्या(पोटातील आतडे) कोरलेल्या आहेत म्हणून कोथळीगड नाव. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. पहाटे ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने मी, स्वराज राजपुत आणि आशिष पाटकर  कर्जत च्या दिशेने निघालो. आशिषचे जवळचे मित्र असलेले अभिनव पानसरे, निखिल म्हस्के, हेमंत शहासने, प्रसाद प्रधान हे सगळे मुंबईच्या दिशेने कर्जत पर्यंत येणार होते. ठरलेल्या वेळी आम्हा सगळ्यांची कर्जतच्या रेल्वे स्टेशन वर भेट झाली. आणि मग एकमेकांची भेट घेऊन ओळख करून देऊन आम्ही सगळे श्रीराम  पुला च्या दिशेने पायी रपेट सुरु केली. कोथळीगडाला कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसनेपण जाता येते. कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवली बस आहे. श्रीराम ब्रिजवरून तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा किंवा जीपापण भेटतात. त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन चौकशी केली.

Book Review - नारायण मूर्ती जीवन चरित्र

Image
नारायण मूर्तीचं जीवनचरित्र असलेलं हे पुस्तक फक्त त्यांचं जीवनचरित्रच समोर ठेवत नाही तर इन्फोसिस कंपनीचा वर्तमानापर्यंतचा प्रवाससुद्धा वाचकासमोर ठेवतं. आलेल्या संधीचा घेतलेला योग्य फायदा जसं की उदारीकरणामुळे खुली झालेली बाजारपेठ, ग्राहकांची जपणूक, कर्मचाऱ्यांची काळजी, जागतिक दर्जाची कार्यप्रणाली या आणि अश्या बऱ्याचश्या मुद्द्यांमुळे इन्फोसिस आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचू शकली. मूर्तींच्या आणि इन्फोसिसच्या या जीवनप्रवासात सुधा मूर्तींचीही वेळोवेळी साथ मिळाली.⠀ ⠀ तरुणवयात मूर्ती समाजवादी विचाराचे होते. पण १९७४च्या बल्गेरियामधील एका प्रसंगाने त्यांना त्यांच्या साम्यवादाबद्दलच्या धाराणांवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले, त्यांचे डाव्या विचारसरणीचे आकर्षण पूर्णपणे पुसून टाकले. त्यामुळे त्यांचे एका गोंधळलेल्या डाव्या मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यातून एका कनवाळू पण निश्चयी भांडवलदारामध्ये रुपांतर केले. पण असे असले तरी या पुस्तकात दिलेल्या कंपनीच्या धोरणांत आणि मूल्यांमध्ये मला समाजवादी विचार ठळकपणे दिसून येतात.⠀ ⠀ पुस्तकातील व्यवसायाचं धोरण, इन्फोसिसमधील कॉर्पोरेट संस्कृती या प्रकरणांतून इन्फोस

AMK a Dream Trek

Image
AMK - ALANG MADAN KULANG FORTS २४ आणि २५ फेब्रुवारी २०१८ AMK म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे हे तीन किल्ले आहेत. कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग-मदन-कुलंग  दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय   प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे पर्वतारोहण (Mountaineering). पण पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. त्यामुळे  हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोहण तंत्राची (Climbing Techniques) व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे.  या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून नष्ट केल्या. गडावर जाणाऱ्या वाटा ब