मुकद्दर
चित्रपट, मालिका, कादंबऱ्या, कथा यांमधून दाखवलेला म्हातारा, धर्मवेडा, कोणाशीही सहज न बोलणारा औरंगजेब आणि त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व ह्यात खूप फरक आहे. औरंगजेब केवळ आपल्याला प्रादेशिक पातळीवर चित्रपट आणि मालिकांच्या बजेटएवढाच किरकोळ दाखवला जातो. आपल्याला ठाऊक असलेला औरंगजेब फार मर्यादित आहे. आपल्याला माहीत आहे, आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तख्त-ए-ताऊसवर बसलेला औरंगजेब ज्याने 'न भूतो न भविष्यति' असा आपला झालेला अपमान पचवला. संभाजी महाराजांचा क्रूर छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला तो औरंगजेब माहीत नाही, जो वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बुऱ्हाणपुरात आपल्या मावशीकडे गेलेला असताना एका बाईच्या प्रेमात पडला होता. तिच्या इष्कात तो इतका बेभान झाला होता की, तिच्याखातर इस्लामच्या विरोधात जाऊन तो दारूही प्यायला सुद्धा तयार झाला होता. आपल्याला औरंगजेब ठाऊकच नाही, ज्याने तख्त मिळवण्यासाठी आपल्या सख्ख्या भावाना मारून टाकलं. तो औरंगजेब माहीत नाही ज्याने फितुरी करून आपल्या भावाला युद्धात मदत केली म्हणून सख्ख्या मुलाला आजन्म कारावासात ठेवलं. आपल्या सख्